Karnataka Election : कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापूरात 4.41 कोटींच्या रोकडसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Karnataka Election : कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापूरात 4.41 कोटींच्या रोकडसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Karnataka Election Cash confiscation in Kolhapur : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता.

दरम्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये 4 कोटी 41 लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 88 लाखांची रोकड, 35 हजार लिटर दारू, सव्वा दोन लाखांचा गांजा, 3.25 कोटींचे रसायन, 5 लाखांची 11 पिस्तूलं, गावठी कट्टे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 2 हजार 890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिसांनी ही माहिती दिली.

Karnataka Election: प्रचाराच्या तोफा थंडविल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आले अडचणीत

दरम्यान कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाकाबंदी आणि तपासणी केली जात आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर गेल्या 15 दिवसांतील या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली मोठी कारवाई करण्यात आली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवारांची आज प्रचारसभा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्नाटकात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तर भाजप आणि कॉंग्रेससाठी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube