Nilesh Lanke Allegation On Ahmednagar Police: खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एलसीबीविरोधात थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर (Ahmednagar Police) उपोषण सुरू केले आहे. खासदार लंके यांनी एक मोठी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. पाच कोटी रूपये देतो, महिन्यालाही पाकिट ठरवून देतो अशी ऑफर देण्यात आली होती. जर हे लोक पाच कोटी रुपये देत असतील तर हे पैसे कुठून आले ? वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पध्दतीने कारभार सुरू असल्याचे आरोपही लंके यांनी केलाय.
मुसळधार पाऊस अन् शूटिंगदरम्यान आशयने मारला मक्याच्या कणीसावर ताव
पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमधील (Local Crime Branch) भ्रष्टाचाराविरोधात खा. लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरातील नागरिकांनी लंके यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्यात. आंदोलनातील मागण्यांसंदर्भात पोलीस अधीक्षकांशी दोनदा शिष्टमंडळाने चर्चाही केली, मात्र ती निष्फळ ठरली.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. समाजाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. एका कर्मचाऱ्याची दहा ते बारा वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते. गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी पाचळशे दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतले जाते. ज्या विभागातून निलंबित झाला, त्याच विभागात संबंधित पोलीस निरीक्षक त्या कर्मचाऱ्याला त्या विभागात बोलवून घेतो. आर्थिक संबंधातून अशा अनेक गोष्टी केल्या जातात. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत असे त्यांनी सांगितले.
NEET-UG 2024: नीटची पुन्हा परीक्षा घेता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, चार कारणेही दिली
कागदोपत्री पुरावे
जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अवैध धंदे वाढले आहेत. त्यातून हत्या घडण्याचे प्रमाण वाढले आहे. चंदनतस्करी, लोखंड, स्टील, रेशनींग, गुटखा, कॅफे, वाळू, आयपीएल सटटा, गुटखा, पेट्रोल डिझेलची तस्करी, जुगार क्लब, वेश्या व्यवसाय, बिंगो हे अवैध व्यवसाय कसे हाताळले जातात याचीही आपल्याकडे सविस्तर माहिती आहे. बिंगो, आयपीएल सट्टा यामुळे अनेक तरुणांनी आपले जीवन संपविले आहे. सुवर्णकार व्यावसायिकांना मोठया प्रमाणावर त्रास दिला जातो अस खासदार निलेश लंके म्हणाले.
कर्डिले ठरवितो कोणला कोणते पोलीस ठाणे !
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने कामकाज केले आहे. याच शाखेचा कर्डिले नावाचा कर्मचारी कोणत्या पोलीस ठाण्यात कोणता कर्मचारी बसवायचा हे ठरवितो. पोलिस अवैध व्यवसायांना पार्टनर आहेत याचेही पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा लंके यांनी केलाय.
ठोस निर्णयाशिवाय माघार नाही
चुकीच्या पध्दतीने काम करणारे अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत. तसेच जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. आंदोलनास किती दिवस लागतील हे माहिती नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय मी माघार घेत नाही. पाच टक्के लोकांमुळे इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे. सामान्य पोलीस कर्मचारी रस्त्यावर राहतो, काम करतो त्यांना पगाराव्यतीरिक्त इतर कोणताही लाभ मिळाला नाही. चार सहा लोकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा बदनाम केली असल्याचा आरोप लंके यांनी केलाय.