MP Nilesh Lanke Said 31 crore fund for Ahilyanagar railway : अहिल्यानगर रेल्वे (Ahilyanagar railway) स्थानकासंदर्भात मोठे अपडेट आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 31 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) दिली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Amrit Bharat Station Scheme) हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाच्या आखत्यारित असलेल्या रेल्वेच्या विविध समस्यांवर खासदार निलेश लंके यांनी संसदेत आवाज उठवला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील रेल्वेसंदर्भातील विकास कामांचा आढावा घेत कार्यवाही केली. त्यानंतर मतदारसंघातील (Ahilyanagar News) स्थानकांचे सुशोभिकरण, आवश्यक तिथे उड्डाणपुल ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले की, सुशोभिकरणाच्या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचे आधुनिकिकरण, स्थानिक प्रवाशांच्या गरजा, नगर शहराची संस्कृती तसेच भविष्यकालिन वाहतूकीचा दृष्टीकोनाचाही त्यात विचार करण्यात आला आहे.
नव्याने प्रशस्त प्रवासी प्रतीक्षायल, स्वच्छ अन् सुसज्ज स्वच्छतागृहे, लिफट, एस्केलेटर, फुड सुविधा, इंटरनेटसाठी वाय-फाय सुविधा, व्यवसायिकांसाठी बैठक कक्ष, रूफ प्लाझा, प्लॅटफॉर्म आणि सर्क्युलेटींग क्षेत्राचा पुनर्विकास, सौर उर्जा, पाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, स्थानिक कला अन् सांस्कृतीक मुल्यांची माहिती देणारे डिझाईन्स देखील यात आहेत.
लवकरच कामाला सुरूवात
अहिल्यानगर हे रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे स्टेशन आहे. रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे तसेच इतर सुविधांमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. तसेच यापुढील काळातही अत्याधुनिक रेल्वे सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कामांसाठी आपण सातत्याने रेल्वेमंत्रालयाकडे पाठपुरावा केलाय, लवकरच या कामांची अंमलबजावणी युध्दपातळीवर सुरू होईल, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली.