Ahmednagar News : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Ahmednagar Collector Offices) शुक्रवारी मविआच्या वतीने शेतकरी जन आक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच असून आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या.
आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी मुक्या जनावरांनाही आंदोलनात सहभागी केले. या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेस लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत. जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत. याच दरम्यान, काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या.
धक्कादायक! शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यादेखील महिलांसोबत जेवण बनवलं. त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा, यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारलं आहे. आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलानी चुली पेटवल्या आहेत.
आमच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात, अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल, असं देखील इथं बोलल्या जात आहे.
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या टाकू
शुक्रवारी रात्री निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बसून कार्यकर्त्यांसह जेवण केलं. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेव, वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या टाकू, असंही त्यांन म्हटलं.