MP Nilesh Lanke : रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke ) यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाला खुद्द निलेश लंके यांनी हजेरी लावली आहे. यावेळी महामार्ग उपअभियंता आणि कंपनीच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे. तसेच वेळोवेळी आंदोलने करुनही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या लंके यांनी उपअभियंता आणि कंपनीच्या ठेकेदाराला शिवीगाळ, कानशिलात लगावल्याचीही चर्चा आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी वरील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत वारंवार आंदोलने होऊन देखील अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे निलेश लंके यांनी महामार्गाचे उपअभियंता आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याना शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याची प्रत्यक्ष दर्षीमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या घटनेने श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
युद्धविराम झाला अन् काँग्रेसला सापडली नवी स्ट्रॅटेजी; 2016, 2019 मध्ये दडलीय खरी कहाणी..
घटनेनंतर निलेश लंके यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी अपूर्ण रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी मागील अनेक वेळा आंदोलन करण्यात आले होते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण करण्यात ठेकेदार कंपनी आणि अधिकारी यांनी दिरंगाई केल्याने मागील दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सुभान तांबोळी यांचे आढळगाव येथे आंदोलन सुरू होते.
ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त विधान भाजप नेत्याला भोवलं; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
या आंदोलनात निलेश लंके हे सहभाग नोंदविण्यास आले. यावेळी उपस्थित असलेले उपअभियंता गायके आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला. याचवेळी संतप्त झालेल्या लंके यांनी महामार्गाचे उपअभियंता अजित गायके आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत कानशिलात लगावली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.