ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त विधान भाजप नेत्याला भोवलं; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

MP High Court Oerder To FIR On BJP Leader Vijay Shah Over Colonel Sofia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त विधान करणं भाजप नेते आणिमध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांना चांगलचं भोवलं आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर न्यायालयाने डीजीपींना चार तासांत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी (Colonel Sofia Qureshi) यांना ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण’ म्हटले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन पाकिस्तानचा बुरखा फाडला होता.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? जाणून घ्या एका क्लीकवर सर्वकाही
काय म्हणाले होते विजय शाह?
ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच बहिणीच्या मदतीने धडा शिकवला, असं वक्तव्य शाह यांनी केलं. एका कार्यक्रमात केलेलं हे विधान सध्या चर्चेत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शाह यांनी मंगळवारी महू येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, ज्यांनी आपल्या मुलींचे-बहिणींचे कुंकू पुसले होते, त्या कटे-पटे लोकांना मोदींनी त्यांचीच बहिण पाठवून त्यांची ऐशीतैशी केली. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावेळी शाह यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेलं नाही, मात्र, ते कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलत होते, असा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असं केलं.
#BREAKING Madhya Pradesh High Court suo motu directs registration of FIR against BJP Minister Vijay Shah for his comment calling Colonel Sofiya Qureshi a "sister of terrorists".
HC says prima facie offences under BNS are made out.#ColonelSofiyaQureshi #MP pic.twitter.com/0nbAbRnXEE
— Live Law (@LiveLawIndia) May 14, 2025
शाह यांनी मागितली माफी
वादग्रस्त विधानानंतर शाह यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात होती. त्यानंतर शाह यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असे म्हणच माफी मागितली होती. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झालेत, असंही शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
VIDEO | Clarifying his remarks regarding Colonel Sofiya Qureshi, Madhya Pradesh Minister Vijay Shah said, "We respect the actions taken by the Indian forces in response to the Pahalgam terror attack. My statement has been misunderstood. Colonel Sofiya Qureshi has made the nation… pic.twitter.com/r6YNiQhJeP
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2025
कोण आहे सोफिया कुरेशी?
सोफिया कुरेशी या मुळच्या गुजराती असून आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या १९९९ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाल्या होत्या. २००६ मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं होतं. २०१० पासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी होत्या.