Operation Sindoor : अखेर पहलगामचा बदला घेतला, पण भारतानं माणुसकीही जपली…वाचा कसं?

Operation Sindoor : अखेर पहलगामचा बदला घेतला, पण भारतानं माणुसकीही जपली…वाचा कसं?

Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानल (Pakistan चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत भारताने दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात अनेक दहशवादी मारले गेले. दरम्यान, आता भारतीय लष्कराने या एअर स्ट्राईकची माहिती दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताचा मोठा निर्णय, धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामने रद्द होणार? 

आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही, कुठल्याही निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली, असं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं.

फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तानला जगभरात दहशतवादाचा आश्रयदाता म्हणून ओळखलं जातं. २३ एप्रिल रोजी भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला. त्यानंतही पाकने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट भारतावच आरोप केला. त्यामुळं भारताने प्रत्युत्तर दिलं. मात्र, आम्ही काळजीपूर्वक विचार करून कारवाई केली आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.

निष्पापांना मारलं जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.
तर भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी दहशतवादी कारवायांचा कणा मोडण्यासाठी आम्ही ही मोहिम राबवली. तसंच जी ठिकाण आम्ही निवडली त्यात सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही, कुठल्याही निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घेतली.

पुढं त्या म्हणाल्या, पीओजेकेमधील पहिला सवाईनाला कॅम्प हा मुजफ्फराबाद येथील तळ उद्धवस्त करण्यात आला. हा लष्कर-ए-तोयबाचा तळ होता. या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचं प्रशिक्षण दशतवाद्यांनी घेतलं होतं. आक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या दोन्ही हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना येथून प्रशिक्षणही मिळाले होते. दुसरा तळ मुझफ्फराबादमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ होता. शस्त्रे आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण येथूनच दिले जायंचं. कोटलीतील फुलपूर येथील तळही उद्ध्वस्त झाला.हा लष्कर-ए-तोयबाचा हा तळ होता.

कुरेशी यांनी सांगितलं की, चौथा तळ भीमबर या ठिकाणचा होता, या ठिकाणीही हत्यारं होती, ट्रेनिंग दिलं जात होतं. हा तळही भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केला. अब्बास कॅम्प कोटली हा देखील उद्ध्वस्त झाला, अशी माहिती कुरेशी यांनी दिली.

दरम्यान, जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असा इशाराही सोफिया कुरेशी यांनी दिलाय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube