Download App

महायुतीचे सरकार येताच गुंडाराज; नगरमध्येही ताबेमारी, गुंडगिरी…; NCP आमदार राऊतांच्या निशाण्यावर

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : राज्यामध्ये गुंडगिरी वाढत चाललेली आहे, तशी नगरमध्येही गुंडगिरी वाढली आहे. नगर शहरामध्ये आमदार हे देवस्थानच्या, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी बळकावत आहेत. त्यांच्या या गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार आहे. नगरचा बिहार होऊ लागला असून नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले आहे, असा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) नगरचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत कडव्या शब्दात हल्लाबोल केला आहे.

Mithila Palkar : ग्लॅमरस मिथिला पालकरचं गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशुट, चाहते फिदा

अहमदनगर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक गायकवाड, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.

नितीश कुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्याची स्क्रिप्ट लिहिणारे ‘सात’ अदृश्य हात… 

यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी नगर शहरातील ताबेमारी तसेच गुंडगिरी यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, मुंबईत दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन या व्यक्ती खंडणी, जमीन बळकवणे व दहशत निर्माण केली जात होती. मात्र त्यावेळी शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड असाल तर आम्हीही महागुंड आहोत असे म्हणत त्यांना रस्त्यावर उतरून विरोध केल्याने ते पळून गेले. अशाच पद्धतीने आता नगरमध्येही गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार असल्याची डरकाळी राऊतांनी फोडली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात आपल्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नगरचे आमदार हे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारसोबत होते. मात्र, राज्यातील नव्या महायुतीच्या सरकारसोबत ते गेल्यानंतर त्या सरकारच्या पाठबळामुळे ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत. नगरमधील गुन्हेगारीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे त्यांचा कोण बॉस आहे हे स्पष्ट होऊ द्या, अशा शब्दात राऊत यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच या आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर माझ्या नेतृत्वाखाली मी महाविकास आघाडीचा मोर्चा काढणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.

follow us

वेब स्टोरीज