अहमदनगर – आगामी निवडणुका पाहता आता राजकीय नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच सध्या विकासकामांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतेच साकळाई योजनेच्या माध्यमातून खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर (Sakalai Yojana) राजकारण सुरू आहे. मात्र आपले सरकार आल्यानंतर या योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एका खासदाराचे असते, आणि ते काम मी अगदी चोखपणे बजावत आहेत. त्यामुळे विरोधकांना कुठेतरी या गोष्टी सहन न होण्यासारख्या आहेत, अशा शब्दात खासदार विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Dawood Ibrahim : कलाकारांना धमक्या ते बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर? असं होतं दाऊदचं बॉलिवूड कनेक्शन…
नगर तालुक्यातील देऊळगाव सिध्दी येथील विकास कामांच्या भूमिपूजनावेळी बोलतांना खासदार विखेंनी विरोधकांवर हल्ला चढवला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम कागदावर आणून चालू केले आहे. हे काम आमदार बबनराव पाचपुते आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर राजकारण सुरू आहे. मागील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीचे सरकार आल्यावर या योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
Animal Box Office: ‘अॅनिमल’ काय ऐकत नाय… भारतात पार केला 500 कोटींचा टप्पा
साकळाई योजनेचे तीन टप्पे होणार असून पहिल्या टप्प्यात ४०० कोटी रुपयाचे काम केले जाईल आणि उर्वरित काम हे पुढील टप्प्यांमध्ये केले जाईल आणि विशेष म्हणजे हे काम काही दिवसातच पूर्ण होणार असल्याची माहिती विखे यांनी दिली.
विरोधकांना सहन होईना….
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात जी अनेकविध विकासकामे केली जात आहेत, ती सर्व विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एका खासदाराचे असते आणि ते काम मी अगदी चोखपणे बजावत आहे. त्यामुळं विरोधकांना कुठंतरी या गोष्टी सहन न होण्यासारख्या आहेत. कारण, एका विकास कामावर वर्षानुवर्षे मतदान मागणे ही कला त्यांना अवगत आहेत. त्यांच्या या काव्याला पूर्णपणे आळा घालण्याचं काम माझ्या हातून होत आहे. त्यामुळं साहजिक आहे विरोधकांकडून विरोध होणारच. मात्र, आपली विकासकामे थांबणार नाही, असं आश्वासन देखील सुजय विखेंनी यावेळी दिले.