खासदार सुजय विखेंच्या मेंदूत केमिकल लोचा; ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका

खासदार सुजय विखेंच्या मेंदूत केमिकल लोचा; ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका

Vikram Rathod On Sujay Vikhe : खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले त्यांच्याच हातात हात घालून आज तुम्ही फिरत आहात ही सपशेल जनतेची फसवणूक? आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करतात पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला असून तुमच्या मेंदूचा झालेला केमिकल लोचा आधी तुम्ही तपासून घ्यावा, अशी खोचक टीका युवा सेनेचे प्रदेश विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर केली आहे.

‘बीड जाळपोळ छगन भुजबळांनीच घडवून आणलायं’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

अहमदनगर महानगरपालिकेच्या एमआरआय प्रकल्पाचे लोकार्पण करताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली होती. यावेळी विखेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन विक्रम राठोड यांनी टीका केली आहे. पुढे बोलताना विक्रम राठोड म्हणाले, खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले, त्यांच्याच हातात हात घालून आज तुम्ही फिरत आहात. ही जनतेची फसवणूक नाही का? महापालिकेच्या एमआरआय सेंटरचे उद्घाटन करताना आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करत असल्याची टीका केली.

आरक्षणाच्या तापलेल्या वातावरणात शिंदे सरकारनं खेळलं ओबीसी कार्ड; तब्बल 3377 कोटींची तरतूद

पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला आहे. तेव्हा तुमच्या मेंदूत झालेला केमिकल लोचा अगोदर तपासून घ्यावा”. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या आगमनाची चेष्टा करण्याइतकी राजकीय हैसियत तुमची नाही, असा तिखट वार विक्रम राठोड यांनी खासदार सुजय विखेेंवर केला.

Rohit Pawar : अजितदादांचं वक्तव्य चुकीचंच; रोहित पवारांनीही रोखठोक सुनावलं

खासदारकीची निवडणूक ज्यांच्याविरोधात लढलात त्यांनाच तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीत युतीचा धर्म तोडून मदत केली. तुम्ही तुमची राजकीय सोय बघितली. या वृत्तीला शिवसेनेने विरोध दर्शविला तर जाहीर भाषणातून तुम्ही याचा उल्लेख करून आम्हालाच आव्हान देत आहात. नगर शहरात ५०० रुपयांत एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तुम्ही देतात. मग महापालिकेच्या एमआरआय तपासणी केंद्रालाच ते का सुरु करीत नाहीत, असा सवालही विक्रम राठोड यांनी केला आहे.

काय म्हणाले होते सुजय विखे?
उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी घराबाहेर पडले आहेत. त्याचा आनंद ठाकरे गटाने व्यक्त करायला हवा. ठाकरे गटाने तर फटाके फोडावेत. घराबाहेर पडणाऱ्या क्वचित नेत्यांपैकी एक उद्धव ठाकरे आहेत. आज ते अधिवेशनाला आले आहेत त्याचा आनंद ठाकरे गटाने व्यक्त करावा, अशी टीका विखेंनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube