Download App

एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी! नाशकात ठाकरेंचा माजी आमदार फोडला; भुजबळांनाही शह देणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

Nashik News : राज्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते, कट्टर शिवसैनिक, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. आताही आणखी एक धक्का नाशकात बसला आहे. माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

विधानसभा निवडणुकीत तर दराडे यांनी थेट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आव्हान दिले होते. परंतु, ते पराभूत झाले होते. शिवसेना एकसंध होती त्यावेळी शिवसेनेने दराडे यांना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था गटातून आमदारकीची संधी दिली होती. अलीकडेच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली होती. त्यामुळे दराडे आता पुढे काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात आहेत. तेव्हा आता नरेंद्र दराडे देखील शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती.

बीडमधील जुनी फळी शरद पवारांसोबतच! व्यासपीठावर माजी आमदारांची गर्दीच गर्दी

या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या. दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने दराडे यांचा शिंदे गटातील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. एक प्रकारे शिंदे गटाला नाशकात बूस्ट मिळाला आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता याही निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दराडे शिंदे गटात जाणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार नरेंद्र दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाच्या नेत्या मीना कांबळी, आमदार किशोर दराडे, सचिव राम रेपाळे, अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.

शिंदे भुजबळांना खरंच शह देणार?

नाशिक जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं वर्चस्व आहे. येवला तालुक्यात दराडे हे भुजबळांचे राजकीय विरोधक आहेत. दराडे आणि भुजबळ यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकीत दराडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना ताकद दिली होती. त्यामुळे येथे भुजबळ विरुद्ध दराडे असा संघर्ष झाला होता.

या संघर्षातूनच दराडे यांच्या पाठीमागे बनावट लेटर हेड प्रकरण लागले होते. आता हा संघर्ष आणखी पुढे जाणार अशी चर्चा असतानाच दराडे यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे या संघर्षाची धार नक्कीच कमी होईल असे सांगण्यात येत आहे. परंतु, राजकारणातील दराडे आणि भुजबळ सामना सुरुच राहील असे जाणकार सांगतात. दराडे यांच्याबरोबर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

धुळे रोकड प्रकरण, कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित; सभापती राम शिंदेंचा मोठा निर्णय

follow us