एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, माजी आमदार रवींद्र धंगेकर पुणे महानगरप्रमुख

एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, माजी आमदार रवींद्र धंगेकर पुणे महानगरप्रमुख

Ravindra Dhangekar : राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे महानगरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील एका वर्षासाठी रवींद्र धंगेकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना पक्षाकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. तेव्हा पासूनच पक्षात रवींद्र धंगेकर यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत पुणे शिवसेना महानगरप्रमुख पदी धंगेकर यांची नियुक्ती केली आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची या पदावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याच आली आहे.

संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर असणार आहे.

धंगेकर यांची जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबतची तळमळ आणि यासाठी आजवर केलेले काम पाहून शिवसेना पक्षाने आज स्वतःहून धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी निवड केली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महानगर प्रमुख पदी (कार्यक्षेत्र पुणे महानगर) आपली नियुक्ती करण्यात येत आहे, असे पत्र रवींद्र धंगेकर यांना शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्याकडून आज देण्यात आले.

‘त्या’ प्रकरणात कारवाई करा, नाना पटोले यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी 

तर दुसरीकडे राज्य सरकारला पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असल्याची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube