Download App

ओबीसीवरून छगन भुजबळांनी भाजपला फटकारे; मोदी हे आडनाव

  • Written By: Last Updated:

नाशिकः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपवर जोरदार आरोप होत आहे. पंतप्रधानांचा अपमान करून राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते ही भाजप नेत्यांना जोरदार फटकारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले आहे. मोदी हे आडनाव आहे. ओबीसीची जात नाही, असे भुजबळ म्हणालेत.

खासदारकी गेली आता सरकारी बंगलाही जाणार…राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याबद्दल भुजबळ म्हणाले, आमदार खासदार असल्यावरच लोकशाहीमध्ये बोलता व भांडता येतं अशातला भाग नाही. राहुल गांधी अथवा संजय राऊत यांची खासदारकी रद्द झाली तरी ते लोकशाही मार्गाने संपूर्ण देशामध्ये आपले म्हणणे मांडू शकतील. आज गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी अनेक बलिदान केले. त्यांच्या वारसावर अशी कारवाई करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला तसेच लोकशाहीच्या अंताकडे चाललेली गोष्ट असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे.

खासदारकी गेली आता सरकारी बंगलाही जाणार…राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अदानी प्रकरणावर बोलत आहे. यात ओबीसी प्रकरणाचा संबंध येत नाही. मोदी ही ओबीसीची जात नाही. हे आडनाव आहे. गायकवाड आडनावाचे लोक मराठा समाज, माळी समाजात आहे. त्यामुळे सर्वच गायकवाड ओबीसीमध्ये येत नाही. मोदी हे आडनाव आहे. ते ओबीसीची नाहीत. ओबीसींची लिस्ट माझ्याकडे आहे. काही कारण नसताना हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे भुजबळ म्हणाले.

Tags

follow us