Download App

Eknath Khadse : ..तर मी गिरीश महाजनांना भर चौकात जोड्याने मारेन; नाथाभाऊंचा पलटवार

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही दोघांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोघांतील वाद आणखीच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गिरीश महाजन यांनी खडसेंचे आजारपण म्हणजे नाटक असल्याची टीका केली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा खडसेंनी कठोर शब्दांत समाचार घेतला. खडसे म्हणाले, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटल गिरीश महाजन यांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली. आता माझं गिरीश महाजन यांना आव्हान आहे माझ्या सगळ्या कागदपत्रांची खातरजमा करावी. माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासावं. जर त्यांना हे सांगता आलं की माझा आजार खोटा आहे, सहानुभूती मिळवण्यासाठी मी हे सारं केलं तर गिरीश महाजन यांनी मला भर चौकात जोडे मारावेत. पण माझी कागदपत्रं खरी आहेत हे सिद्ध् झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं महाजन हे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील.

संकटमोचक म्हणवून घ्यायचं अन् पळ काढायचा 

गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे. खरं तर त्यांनी कापसावर बोललं पाहिजे. आज कापूस उत्पादक, केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागच्या वेळी शहाणपणा केला आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले सरकारचे संकटमोचक झाले. आता जरा पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेऊन पहा. संकटमोचक म्हणवून घ्यायचं आणि पळ काढायचा आणि शेपूट घालायचं असं महाजन करत आहेत, अशी घणाघाती टीका खडसे यांनी केली.

Girish Mahajan : ‘सोंगं करायची, उपचार घ्यायचे अन् पुन्हा आरोप करायचे’ महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल

काय म्हणाले होते गिरीश महाजन ? 

एकनाथ खडसेंना स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेण्यास सांगा. सर्व प्रश्न आपोआप सुटतील. 137 कोटींची नोटीस आल्यानंतर सोंग करायचे. काही झाले नसताना दवाखान्यात जाऊन बसायचे. केवळ नोटीस आल्यामुळे त्यांनी कोर्टाची सहानुभूती मिळवण्यासाठी आजारपणाचे नाटक केले. त्यांना असा कोणता हृदयविकाराचा झटका आला. खोटी सोगं करायची, उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे याला काय म्हणावे अशी टीका काल मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज