Jayant Patil : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित आहेत. या शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचा विडा काही जणांनी उचललाय पण, डरने की जरुरत नहीं संपूर्ण पक्ष कोल्हेंच्या पाठिशी उभा आहे, असा इशारा जयंत पाटील यांनी अजित पवार यांना दिला. शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डीत सुरू आहे. या शिबिरात उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कष्टानं काम केलं आहे. खासदार कोल्हे यांनी तर शेतकरी आक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता मात्र त्यांना निवडणुकीत पाडण्याचा विडा काही जणांनी उचलला आहे. पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानींचा तुम्हाला आशिर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही घाबरण्याचं काहीच कारण नाही. सर्व पक्ष तुमच्यासोबत उभा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’ मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट?
आगामी काळ निवडणुकांचा आहे. आता आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपला पक्ष फुटला आहे. त्यामुळे मागच्या लोकांना पुढील रांगेत बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता जे पुढं बसले आहेत त्यांनी सोडून गेलेल्यांचे आभार मानावेत अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यावेळी सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. यानंतर प्रसारमाध्यमांशीही जयंत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
रोहित पवारांची दांडी, जयंत पाटलांनी खरं सांगितलं
आमदार रोहित पवार या शिबिराली उपस्थित नाहीत याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, पक्षाचं शिबीर दोन दिवस सुरू राहणार आहे. रोहित पवार सध्या परदेशात गेले आहेत. आमचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत ते येतील आणि शिबिराला उपस्थित राहतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरानंतर आता रोहित पवारांच्या गैरहजेरीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पाकिस्तानमध्ये जाऊन 26/11 हल्ल्याचा बदला घेणार होते जयंत पाटील, ‘असा’ होता प्लॅन