‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’; मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट?

‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’; मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट?

Hasan Mushrif on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले. निवडणुका जवळ येत आहेत तसे फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहेत. या काळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाबरोबर जातील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत असून अजित पवारांच्या गटातील नेत्यांकडूनही त्यास हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताही अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुश्रीफ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासंदर्भात वक्तव्य केले.

नेहरूंना भेटण्यासाठी बबनरावांनी थेट दिल्ली गाठली…’चाचा मला शिकायचे आहे, पण…

ते म्हणाले, जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं कर्तव्य आहे. जयंत पाटील एका घटनेमुळं तिकडं थांबले. ते आताच सांगत बसणार नाही. कधीतरी नक्की सांगेन. मी नीतीमूल्ये पाळणारा माणूस आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, कोणत्या कारणामुळे जयंत पाटील अजित पवार गटाबरोबर आले नाहीत याचे उत्तर मात्र मुश्रीफ यांनी दिले नाही. त्यामुळे अशी कोणती गोष्ट आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. जयंत पाटील अजित पवार गटाबरोबर जाणार असल्याच्या वावड्या याआधीही उठल्या होत्या. त्यामुळे मुश्रीफांच्या वक्तव्यावर जयंत पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार? भास्कर जाधवचा CM शिंदेंवर निशाणा

जयंत पाटलांचं मोदींना उत्तर 

शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही, असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत मोदी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुकर करत असल्याचं दिसतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube