Anil Patil NCP MLA : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता अजितदादा गटातील मंत्री आपापल्या मतदारसंघात परतले आहे. त्यातील अनिल पाटील यांच्या नावाची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे सुरु झाली आहे.
अनिल पाटील हे रेल्वेने प्रवास करत जळगावला पोहोचले. यानंतर कॅबिनेट मंत्री अनिल पाटलांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दुतर्फा बसवण्यात आलं होतं, त्यामुळे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.
ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला
हे विद्यार्थी अमळनेर येथील एस एस पाटील आश्रमशाळेचे होते. हे सर्व विद्यार्थी मंत्र्यांची वाट पाहत रस्त्यावरच उन्हात बसले होते. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने मंत्र्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही आश्रमशाळा भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांची शैक्षणिक संस्था असल्याची माहिती आहे. मंत्र्यांच्या स्वागतासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना उन्हात बसवणे हे कुणालाही आवडले नसून यामुळे मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शरद पवारांच्या आधी अजितदादाच वळसे पाटलांच्या मतदारसंघात पोहोचणार
दरम्यान, अनिल पाटील हे जळगावच्या अमळनेरचे आमदार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच आपल्या मतदारसंघात गेले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आता आमच्याकडे असलेल्या आमदारांचा आकडा हा 44 पेक्षा अधिक आहे. काही दिवसातच तो वाढत जाऊन सर्व आमदार आमच्याकडे येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे.