Download App

Video : हो, मी नाराज; मला डावललं काय अन् फेकलं काय? भुजबळांच्या मनातलं अखेर बाहेर आलचं

पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की "हो मी नाराज आहे." 

प्रशांत गोडसे (लेट्सअप प्रतिनिधी)
Chhagan Bhujbal on Maharashtra Cabinet Expansion :
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा अनेक ज्येष्ठ नाहीत. नवीन चेहऱ्यांचा भरणा दिसतोय. याचं कारण म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांनी माजी मंत्र्यांना धक्का दिलाय. माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी डावलण्यात आलं. यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी लपवून ठेवलेली नाही. आज पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की “हो मी नाराज आहे.”

चव्हाण, भुजबळांचा पत्ता कट; फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दडलेले 6 संदेश

भुजबळ पुढे म्हणाले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय फेकलं काय काहीही फरक पडत नाही. मंत्रिपद कितीही वेळा आलं आणि गेलं. तरीही भुजबळ काही संपला नाही. खरं तर ज्यांनी मला मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत. मनोज जरांगेंना विरोध केल्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळात डावलण्यात आलं का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले त्याचंच बक्षीस मला मिळालं.

यानंतर अजित पवार यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांच्याकडून तुम्हाला काही आश्वासन मिळालं का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, अजून तरी माझं त्यांच्याशी काहीच बोलणं झालेलं नाही. त्यांच्याबरोबर बोलण्याची मला आवश्यकता देखील वाटली नाही. आता पुढे काय करायचं याचा निर्णय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीने घेतली भुजबळांची भेट

दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भुजबळांची समजूत काढण्यासाठी अजित पवारांच्या विश्वासू प्रमोद हिंदुराव यांना भुजबळ यांची भेट घेण्यासाठी पाठवले आहे. यानंतर प्रमोद हिंदुराव यांनी भुजबळांची भेट घेत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. यानंतर समोर येत असलेल्या माहितीनुसार छगन भुजबळांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.

भुजबळ नाराज नाहीत – भरणे

छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सगळे त्यांन भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. आमच्या वरिष्ठांनी त्यांच्याबाबत काय करायचं हे निश्चित ठरवलं असेल असे मला वाटते, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. छगन भुजबळ आजिबात नाराज नाहीत. ते आम्हा सर्वांचे नेते आहेत. छगन भुजबळ यांच्याबाबतीत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

follow us