Download App

Rohit Pawar : ‘राष्ट्रवादी’चा निकाल अजितदादांच्या विरोधात? रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं

Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे. मात्र, हा निकाल आश्चर्यकारक राहणार असून अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात असेल असे आम्हाला वाटत असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचे तर त्याचवेळी एकाची ताकद संपवण्याचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद संपवली जाईल. त्यामुळे 31 जानेवारीचा निर्णय हा आश्चर्यकारक असलेला दिसेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Crisis) आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Rahul Narvekar : नार्वेकरांच्या ‘या’ पाच निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार LetsUpp

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narveka) निकाल देणार आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. 25 जानेवारीपर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर नार्वेकर यांनी आपला निर्णय राखून ठेवला आहे. 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तसेच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन्हीही आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray : ‘हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटण्याची गरज मला नाही’ ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?

follow us

वेब स्टोरीज