नाशिकमध्ये एकाची मक्तेदारी नाही, तुम्ही शाब्दिक खेळ करु नका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांना दम भरला आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रभर स्वाभिमान सभा घेत आहेत. नाशिकच्या स्वाभिमान सभेवरुन रोहित पवारांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप प्रवक्त्याने घेतला भुजबळांचा समाचार; ब्राह्मण समाजातील शिवाजी अन् संभाजी नावांची दिली यादी
आमदार पवार म्हणाले, मंत्री छगन भुजबळ साहेबांना एकच विनंती आहे, ज्यावेळेस भाजपच्या विरोधात बोलत होते तेव्हा त्यांना विरोध केला पण आता तुम्ही त्यांच्याच सोबत जाऊन बसला आहात. त्यामुळे तुम्ही अशी भूमिका का घेतली? असा प्रश्न आमच्या आणि जनतेच्या मनात आहे. नाशिक कोण्या एकाची मक्तेदारी नसून तुम्ही शाब्दिक खेळ करू नका, तिथले नागरिक स्वतःहून शरद पवारांना भेटून सभा घेण्याबाबत सांगत असल्याचं ते म्हणाले आहेत.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंवर ठाकरेंचा पुन्हा डाव, शिर्डीच्या मैदानात उतरविणार!
तसेच भाजपचा ट्रॅक ओबीसीच्या विरोधात आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत कधीच भूमिका बदलली नाही. त्यांनी आत्तापर्यंत कधीच विचारांशी गद्दारी केलेले नाही. ओबीसी आरक्षण भाजपमुळे गेले म्हणणारे छगन भुजबळ आज त्यांच्यासोबत गेल्याची सडकून टीकाही रोहित पवारांनी भुजबळांवर केली आहे.
IND vs IRE : पहिल्याच सामन्यात पावसाचा खेळ! टीम इंडियाने अवघ्या 2 धावांनी सामना जिंकला
दरम्यान, राष्ट्रवादीत काही दिवसांपूर्वी उभी फुट पडली. राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर राजकीय भूकंप झाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. फुट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच नाशिकमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यावर छगन भुजबळांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
नाशिकनंतर आता शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये सभा घेतली. या सभांमध्येही शरद पवारांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे अजित पवार गटही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांच्या स्वाभिमान सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटानेही रणशिंग फुंकलं आहे. बीडमध्येच येत्या 27 तारखेला अजित पवार गटाची सभा पार पडणार आहे.