Download App

Sharad Pawar : …म्हणून निलेश लंके म्हणाले, पवारसाहेब माझा बालहट्ट पुरतात

अहमदनगर : ‘पवारसाहेब माझी ताकद आहेत. ते परिस आहेत. त्या परिसाचा माझ्या अंगाला स्पर्श झाला मी भाग्यवान झालो. म्हणून माझ्या मागच्या वर्षीच्य वाढदिवसालाही पवारसाहेब आले आणि या वाढदिवसालाही शरद पावर आले. मागच्या वर्षी 10 मार्चला त्यांचं शेड्युल्ड व्यस्त होत पण माझा वाढ दिवस म्हटल्यावर ते वेळात वेळ काढून आले होते. त्यानंतर आता देखील नाशिक दौरा होता. पण मी हट्ट केला आणि आजही पवार साहेब आले.’

‘कारण साहेबांकडे हट्ट नाही करायचा तर कोणाकडे करायचा. माझा बालहट्ट पुरवण्याचं काम करतात ते म्हणजे पवारसाहेब ज्या ज्यावेळी अडचण येते. तेव्हा तेव्हा पवारसाहेब माझी अडचण दूर करतात.’ असं वक्तव्य पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केलं. ते अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वत: निलेश लंके बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थित आहेत.

रामदास कदमांना धक्का, बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात</a>

यावेळी पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गरीब मुला-मुलींना तब्बल 7 हजार सायकल्सचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्री रोजगार योजनेतून सुशिक्षित बेराजगारांना पिकअपचे वितरण केले गेले. त्यांना यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात पिकअपच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. घरकुल योजनेचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं.

Tags

follow us