अहमदनगर – लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून आता नगर दक्षिणेमध्ये राजकारण तापताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत याप्रकरणी एकाला अटक केली.
Shehnaz Gill : शहनाज गिल ‘सिद्धिविनायका’च्या चरणी नतमस्तक
निवृत्ती गाडगे (Nivrutti Gadge) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला मुंबईतून अटक केली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नगर दक्षिणेमधून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली. विखे यांचा प्रचार देखील सुरु झाला. याचदरम्यान सोशल मीडियावर एक धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देणारी अशी ऑडिओ क्लिप होती. या व्हायरल क्लि मध्ये असलेल्या दोन व्यक्तींमधील एक व्यक्ती पारनेर पंचायत समितीचा माजी सदस्य निवृत्ती गाडगे असल्याची चर्चा सुरू होती.
संबंधित गाडगे हा विखे यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे लंके यांचे समर्थक असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी स्वतः खुलासा करत आपला या ऑडिओ क्लिप्सची कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे देखील व्हिडिओत स्पष्ट केलं होतं. मात्र, असं असले तरी अज्ञात व्यक्तींकडून लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला थेट गोळ्या घालण्याची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने पोलिसांनी याबाबत गंभीरपणे पाऊल उचलली.
याबाबत भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी गाडगे हा नवी मुंबईत असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नवी मुंबईतील पथकाला दिली. यानंतर पोलिसांनी निवृत्ती गाडगेला ताब्यात घेतले आहे.