अहिल्यानगर : जिरायती भागाच्या 13 गावातील शेतकऱ्यांची मागील पाच दशकांची प्रतीक्षा संपली आहे. टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून कोपरगाव (Kopegaon)तालुक्यातील चार गावांचे 951 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. वितरीका क्रमांक चारमधून कोपरगाव तालुक्यातील 2 हजार 681 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या (Niwande canal) लाभक्षेत्रातील एकूण 3 हजार 632 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे (Mla Ashutosh Kale/strong>)यांनी सांगितले.
ऊर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक चारचे 36.33 कोटी व टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे 36.32 कोटी असे एकूण 72.65 कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा भूमिपूजन भूमिपूजन सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवारी मनेगाव येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार आशुतोष काळे म्हणाले की, जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे कालव्याच्या वितरिकांचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 3632 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मी कामाचा माणूस आहे. लोक माझ्याकडून कामाची अपेक्षा ठेवतात आणि मी ती पूर्ण ताकदीने पूर्ण करतो. मला मिळालेले पद मिरवण्यासाठी नाही तर जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे करण्यासाठी आहे. (Niwande canal Four villages in Kopargaon will come under irrigation; MLA Ashutosh Kale)
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचे मला समाधान आहे. निळवंडे आणि उजनी प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील भूजलपातळी सुधारलीय. रांजणगाव परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. 2020 मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या मार्फत कालव्यांसंबंधी बैठक घेऊन निधी मंजूर करून घेतला होता. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे या कामास गती मिळाली आहे. झगडे फाटा -वडगावपान फाटा रस्ता दुरुस्तीला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना झगडे फाटा ते वडगावपान फाटा तालुका हद्द रस्त्याची दयनीय स्थिती दाखवून दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवने व पाच कोटी निधीच्या दुरुस्तीचे रांजणगाव देशमुखपासून सुरु झाले आहे. या रस्त्याचे एचएएम (HAM) योजनेतून लवकरच काम मंजूर होणार आहे. बिबट्याचा समावेश शेड्युल एकमधून शेड्युल दोनमध्ये टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
हे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाचे तसेच पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले. ह्या वितरिकांच्या कामासाठी आ. आशुतोष काळे यांनी सीडीओ नाशिकचे अधीक्षक अभियंता सी.एन. माळी यांच्याकडे पाठपुरावा करुन डिझाईन मूल्यार्पण करून घेतल्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.
मुलांचे लग्न जमायला लागले-सरपंच रहाणे
निळवंडेचे पाणी कोपरगाव तालुक्यापर्यंत येण्यासाठी वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून तसेच पदरमोड करून जेसीबी देऊन आमदार आशुतोष काळे रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मोटारसायकलवरून पाटापाटाने फिरले आहेत. आमदार आशुतोष काळे भाषण ठोकण्यात नाही तर कामात एक नंबर आहे. पिंपळाच्या बंधाऱ्यात पाणी येण्यासाठी बोडखेवाडी पॉइंट ते पिंपळाचा बंधारा ते मऱ्या आईचा बंधारापर्यंत पाणी आणण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केला. त्यामुळे पूर चारीला पाणी आणने शक्य होणार आहे. पूर चारीच्या सर्वेक्षण कामाची वर्क ऑर्डर येत्या २५ नोव्हेंबरच्या आत होणार या कामाचे प्रोजेक्ट रिपोर्ट अगोदरच तयार करून घेतल्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळणे सुलभ होणार आहे. रांजणगाव देशमुखच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरपंच जिजाबाई मते यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत केल्यामुळे पाठपुराव्यात अडचणी आल्या नाही. निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचविण्यासाठी वेळोवेळी पदरमोड करून खर्च केल्यामुळे प्रत्येक गावाला चाऱ्या नसतांना देखील पाणी पोहोचविले. त्यामुळे आता आमच्या जिरायती भागाच्या गावातील मुलांचे लग्न जमायला लागले ते आमदार आशुतोष काळे यांनी पाणी आणल्यामुळे. न केलेल्या कामाचे स्टेट्स ठेवून, फ्लेक्स फाडून व प्रसिद्धी माध्यमात खोट्या बातम्या प्रसिद्ध करून आ. आशुतोष काळे यांचे कर्तृत्व कधीही झाकले जाणार नाही, असे बहादपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी म्हटलंय.
यावेळी उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे उपअभियंता ए.जी. शेख, कुणाल चोपडे, कॉन्ट्रॅक्टर मे. फलौदी कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर इंदोरचे प्रोजेक्ट मॅनेजर किशोर डुबल, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाअर चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
