Download App

आमदार जगतापांची खासदार विखेंना ऑफर, ‘आगामी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवा’

Sangram Jagtap on Sujay Vikhe : राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर त्याचे परिणाम नगरच्या राजकारणात देखील दिसू लागले आहे. एकेकाळी एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेले खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सूर जळले आहे. शहरातील अनेक कार्यक्रमांना दोघेही हजर असतात आणि एकमेकांनी स्तुतीही करतात. त्यामुळे आमदार जगताप भाजपात जाणार अशी चर्चा होत असते. पण मागील आठवड्यात दोघांनीही एकमेकांना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी आमदार जगताप यांना भाजपात येण्याचं आमंत्रण दिले होते. परंतु आता या आमंत्रणावरुन संग्राम जगताप यांनी विखेंना राष्ट्रावादीत प्रवेशाची ऑफर दिली आहे. जगतापांनी दिलेल्या ऑफरमुळे नगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

संग्राम जगताप काय म्हणाले?
खासदार सुजय विखे यांनी मला भाजपात येण्याचं आमंत्रण दिले आहे तो एक विनोद होता. आमचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे भाजपबरोबर सत्तेत आहेत. त्यामुळे माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येतच नाही, असे जगताप म्हणाले.

निळवंडेच्या पाण्याचं PM मोदींचा हस्ते लोकार्पण : विखे-पाटलांनी 11 महिन्यांपूर्वीच रोवली होती मुहुर्तमेढ

पुढं ते म्हणाले की खासदार विखे यांनीच राष्ट्रवादीमध्ये आता यायला हवं. हे आमंत्रण विनोद नव्हे तर गांभीर्याने देत आहे. राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यात वाढते संघटन आणि खासदार विखेंचे काम करण्याची पद्धती पाहिली तर आगामी लोकसभा विखे हे राष्ट्रवादीकडून लढले तर त्यांना फायदा होईल. अजित पवार यांच्याकडे मी त्यांना घेऊन जातो. त्यांनी पूर्वी राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रयत्न केलाय हे सर्वांनाच माहिती आहे, असेही आमदार जगताप यांनी म्हटलं आहे.

PM Modi येणार शिर्डी दौऱ्यावर, लोकसभेच्या गणितांवर खलबतं होणार?

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
सुजय विखे यांच्या आमदार जगतापांना भाजपमध्ये येण्याचा आमंत्रणाने भाजप संघटनेमध्ये अस्वस्था पसरली होती. आता जगताप यांनी विखेंना राष्ट्रवादीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत या दोन नेत्यांच नेमके चाललंय काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

Tags

follow us