PM Modi येणार शिर्डी दौऱ्यावर, लोकसभेच्या गणितांवर खलबतं होणार?
PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येणार आहेत. दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी आमदार खासदार हे देखील उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोदींच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधानांचा हा दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी असला, तरी यातून राज्यातील लोकसभेच्या अनेक गणितांवर खलबतं होण्याची शक्यता आहे.
पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी 5 पाचही आरोपी दोषी, दिल्ली न्यायालयाचा निर्णय
अहमदनगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला आमदार राम शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे आदींसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा, शिर्डी देवस्थानमधील दर्शन रांगेचा प्रारंभ, रुग्णालयाचा समारंभ, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विभागाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम नियोजित आहेत. महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या दौऱ्याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामध्ये भाजपकडून इंडिया आघाडीला टक्कर देण्यासाठी रणनिती आखली जात आहे. त्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रमक सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचं जरी निमित्त असलं तरी देखील हे दौरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहेत. एवढं नक्की.