आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक

आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक

Koffee With Karan 8: बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून करण जोहरचं (Karan Johar) नाव घेतलं जातं. करण जोहर त्याच्या सिनेमासोबतच त्याच्या फॅशन आणि त्याच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता एका वेगळाच कारणाने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे ‘कॉफी विथ करण सिझन 8’चा (Koffee With Karan 8) लवकरच चाहत्यांचा पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोच्या सेटची एक झलक सध्या सोशल मीडियावर (Social media) शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘कॉफी विथ करण सीझन 8’ च्या सेटची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओत सेट उभारतानाची काही फोटो आहेत. तर पांढऱ्या रंगाचा आयकॉनिक सोफा बघायला मिळत आहे. तसेच ‘कॉफी विथ करण’ असं नाव असलेला कप देखील दिसत आहे. ‘कॉफी विथ करण सीझन 8’ चा सेट तयार झाला असून करण चाहत्यांच्या भेटीसाठी लवकरच सज्ज होणार आहे.

शेवटचा सीझन देखील खूपच मनोरंजक होता. याठिकाणी सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, अक्षय कुमार, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि समंथा रुथ प्रभू यांच्यासह अनेक स्टार्स यामध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली होती. आता चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा ‘कॉफी विथ करण सीझन 8’च्या नव्या पाहुण्यांकडे खिळल्या असल्याचे बघायला मिळत आहे.

क्राईम अन् सस्पेन्सने भरलेला ‘SAJINI Shinde Ka Viral Video’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

चाहत्यांना पुन्हा एकदा करण जोहरच्या शोचा नवीन सीझन OTT प्लॅटफॉर्मवर लवकरच बघता येणार आहे. यावेळी पुन्हा ‘कॉफी विथ करण सीझन 8’ Disney+ Hotstar वर प्रसारित करण्यात येणार आहे. प्रेक्षक २६ ऑक्टोबर २०२३ पासून या सीझनचे पुढील भाग बघू शकणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube