अहमदनगर – केंद्र सरकारने कांदा निर्यादबंदी (Onion export ban)करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. यामुळं विरोधक आक्रमक झाले होते. आज विरोधकांनी कांद्याची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हेही आज रस्त्यावर उतारले होते. चांदवडमध्ये त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकावर टीकेची झोड उठवली. त्यावर भाष्य करतांना खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) खोचक टोला लगावला आहे. त्यांना कुठेही उतरू द्या, त्यांच्या उतरण्याने अथवा त्यांच्या चढण्याने काही एक फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला.
Article 370 Verdict : कलम 370 वैध ठरवणारे न्यायमूर्ती आहेत तरी कोण?
एमआरएफ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सुजय विखे यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले. कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. खासदार विखे यांना प्रश्न केला असता त्यांनी पवारांवरती मिश्किल टिप्पणी केली
विखे म्हणाले, शरद पवारांना कोठेही उत्तर द्या, त्यांच्या उतरण्याने किंवा चढण्याने काही एक परिणाम होणार नाही. त्यांना जे करायचं ते करू द्या…. शरद पवार हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे असे लोक म्हणतात, त्यामुळे ते स्वतंत्रपणे विद्यापीठ असल्यानं ते स्वतंत्रपणे चालतील, पण काहीही फरक पडणार नाही, असं विखे म्हणाले.
PhD, MBA अन् Law… : मध्य प्रदेशला मिळाले उच्च विद्याविभूषित मुख्यमंत्री; कोण आहेत मोहन यादव?
एकमेकांचे लोक फोडायचे नाही…
एका कार्यक्रम प्रसंगी सुजय विखे यांनी आमदार जगताप यांना भाजपात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. यावर बोलताना विखे म्हणाले, त्यांनी मला राष्ट्रवादीत येण्यास सांगितले तर मी त्यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार आले आले असल्याने आता कोणालाही कुठे प्रवेश करण्याची गरज नाही. आज तीनही नेत्यांनी ठरविले आहे की, महायुतीत एकत्र राहण्याचे. एकमेकांच्या पक्षातील नेते फोडायचे नाही… आज आम्ही पक्ष म्हणून वेगळे असलो तरी महायुतीचे घटक आहोत, असं विखे म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना पवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, घाम गाळून काळ्या आईशी इमान ऱाखणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी वर्गाविषयी सरकारला आस्था नाही, ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या जवळ शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही. कांदा निर्यातंबीदीचा निर्णय अन्यायकारक आहे. सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच, लागले. कांद्याला जोपर्यंत किंमत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पवारांनी दिला होता.