ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक

Ahmednagar Breaking News : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला होता. हे हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुण्यातून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश हूच्चे व नंदू बोराटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची […]

Untitled Design   2023 06 20T111606.960

Untitled Design 2023 06 20T111606.960

Ahmednagar Breaking News : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला होता. हे हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुण्यातून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश हूच्चे व नंदू बोराटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील संदीप गुडा अद्यापही पसार आहे. (Onkar bhaganare murder case ahmednagar)

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर शहरातील ओंकार भागानगरे या तरुणाचा बालिकाश्रम रोड वरती तलवारीने खून करण्यात आला होता. पोलिसांना अवैध धंद्याची माहिती देत असल्याच्या कारणावरून हा खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ओंकारच्या कुटुंबीयांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता. आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.

Video : PM मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा उभे राहिले खासदार, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

घटनेचे गंभीरता ओळखत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले होते. बुधवारी रात्री या हत्याकांड प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली होती.
या हल्ल्यातील मुख्य आरोपी हे फरार होते. या हत्याकांडातील आरोपींना पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गणेश हूच्चे व नंदू बोराटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील संदीप गुडा अद्यापही पसार आहे.

पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली आहे. दरम्यान दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली असली तरी एक आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपीचाही लवकरात लवकर शोध घेतला जाईल अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version