Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा तरुण अलीनगर जिल्हा दरभंगा बिहार येथील रहिवाशी आहे.
राज्यात पब्जी गेमच्या माध्यमातून मोठं नेटवर्क सुरु असल्याचं समोर येतंय. पब्जी गेमच्या माध्यमातून अनेक मुलांना या खेळाचं वेड लागतं. मुलं समोहित होतात आणि याचाच फायदा घेऊन मुलींना जाळ्यात ओढले जाते. बिहारमधील एक मुलगा यासाठी काम करत होता. संगमनेरमध्ये एका मुलीला भेटण्यासाठी आला होता. ती मुलगी उच्च शिक्षित असल्याने तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या 31 मुलीचे नंबर मिळून आले आहेत. हा या मुलींच्या संपर्कात असावा आणि त्या मुलींशी लग्न करुन धर्मातर करावं असाही पोलीसांना संशय आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. यापूर्वी ऑनलाइन गेमद्वारे मुलांचे धर्मांतर करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या शाहनवाज खान उर्फ बड्डो याला अटक करण्यात आली आहे. शाहनवाज खानला काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. शाहनवाज खान हा रँकेटच्या म्होरक्या असल्याचे म्हटलं जात आहे.
आशिष देशमुखांना पाच वर्षांतचं उपरती; विदर्भाच्या विकासासाठी भाजपचं
अक्रम शाहाबुद्दिन शेखने पब्जी गेमच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तरुणीला भेटण्यासाठी थेट संगमनेर गाठले होते. तरुणीसोबत गोड गोड बोलत आरोपी अक्रम तिला एका निवांत जागेत घेऊन गेला, काहीतरी चुकीचे घडत आहे हे पीडित तरुणीच्या लक्षात येताच ती घरी जाऊ लागली. त्यावेळी आरोपी अक्रम पीडित तरुणीसोबत बळजबरी करायला लागला आणि आपण बिहारला जाऊ लग्न करु असे सांगायला लागला. तरुणीने पळवण्याचा प्रयत्न करताच तुझे व्हिडिओ बनवून मारुन टाकू अशी धमकी अक्रम आणि त्यांच्या मित्राने दिली.
त्यानंतर तरुणीने आपल्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अक्रमला ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याच्या मोबईलमध्ये तो अनेक हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे समोर आले.