आशिष देशमुखांना पाच वर्षांतचं उपरती; विदर्भाच्या विकासासाठी भाजपचं

आशिष देशमुखांना पाच वर्षांतचं उपरती; विदर्भाच्या विकासासाठी भाजपचं

Aashish Deshmukh On BJP :  काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे उद्या ( 18 जून ) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याआधी त्यांनी आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आशिष देशमुख यांनी 2014 साली राष्ट्रवादीचे नेते आणि आपले काका अनिल देशमुख यांना काटोल मतदारसंघातून पराभूत करत आमदार झाले होते. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. यानंतर 2018 साली त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

Letsupp Special : पक्ष बदलले पण वैर नाही! केदार विरुद्ध देशमुख संघर्षाची धार तीव्र होणार?

याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपची स्तुती केली आहे. विदर्भाच्या आणि ओबीसींच्या विकासासाठी भाजपच योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी ओबीसींच्या हितासाठी आवाज उचलला म्हणून काँग्रेसने मला बडतर्फच नाही तर 6 वर्षांसाठी निलंबनही केले. त्यामुळे विदर्भाच्या हितासाठी आणि ओबीसींच्या सन्मानासाठी मी राजकारणात आहे. त्यासाठी मला भाजपने  संधी दिली. या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. भाजप आणि विदर्भ यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच नितीन गडकरी यांनी वेळोवेळी मला राजकीय उदयासाठी मदत केली आहे. त्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे. त्याअनुषंगाने मी त्यांची भेट घ्यायला आलो होतो, असे त्यांनी सांगितले.

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप

दरम्यान,  2018 आशिष देशमुख यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाद झाले होते. त्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एवढेच नाही तर 2019 साली त्यांनी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींवर टीका केली होती. त्यामुळे आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube