विरोधकांनी कोपरगावच्या विकास कामांना स्थगिती दिली होती, काकासाहेब कोयटे यांना लोकांचा पाठिंबा

विरोधकांनी कोपरगाव शहरातील २८ विकास कामांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली होती हे कोपरगावकरांनी कधीही विसरता कामा नये.

News Photo   2025 11 24T202834.995

News Photo 2025 11 24T202834.995

कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि प्रभाग क्र.१४ मधील नगरसेवक (Election) उमदेवारांच्या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरीकांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरीकांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले यांनी विरोधकांच्या पापाचा हिशोबच मांडला. ते म्हणाले की, माजी नगराध्यक्षांनी पत्रकारांसोबत शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या तळ्याची पाहणी केली असता त्यांना पिण्याच्या तळ्याच्या शेजारी बेकायदेशीर तळे तयार करून कोपरगावचे पाणी चोरत असल्याचे निदर्शनास आले हे संपूर्ण कोपरगावकरांनी पाहिले आहे.

तर दुसरीकडे निवडून आल्यापासून कोपरगावच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी विरोधकांनी छुपा विरोध करूनही आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे कोपरगावच्या नगरपालिकेची सत्ता पाणी चोरणाऱ्याकडे देण्यापेक्षा पाणी देणाऱ्याच्या ताब्यात द्या तुमच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शहराध्यक्ष सुनिल गंगूले यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, २०१४ ते २०१९ दरम्यान शहरातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या प्रलंबित ठेवण्यात आल्या. शहराच्या समस्यांकडे विरोधकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आज विरोधकांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर ते विकास कामांच्या ठरावांना विरोध करतील आणि शहराचा विकास ठप्प करतील.

कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवून देतो; आमदार आशुतोष काळेंची ग्वाही

विरोधकांनी कोपरगाव शहरातील २८ विकास कामांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली होती हे कोपरगावकरांनी कधीही विसरता कामा नये. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता गेल्या पाच वर्षांत केली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे, लवकरच शहरात भूमिगत गटारींची कामे होणार असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने आता शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाच नंबरचे तळे पूर्ण झाल्याने या योजनेचा कोपरगाव शहराला मोठा लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या तळ्याच्या कामात विरोधकांनी अडथळे आणले.

आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि काही वकीलांच्या माध्यमातून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अडथळे आणले. परंतू शेवटी न्यायालयाने काम करणाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. कोपरगावच्या विकासासाठी सक्षम असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या. आ.आशुतोष काळे यांनी पाच वर्षात कोपरगाव शहराचा कायापालट करून दाखविला आहे, आपले हक्काचे पाणी मंजूर असतांना ते पाणी चोरले जावून कोपरगावकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे आपल्याला पाणी देणारे नेतृत्व पाहिजे की, पाणी चोरणारे हे नागरिकांनी ठरवावे अशी भावनिक साद घालत विकासाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन यावेळी सुनिल गंगुले यांनी नागरिकांना केले.

Exit mobile version