PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित युवकांना दिला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
मोदी पुढे म्हणाले, आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषाला समर्पित आहे ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन उर्जेने भरले. स्वामी विवेकानंदांना भेटणे हे माझे भाग्य आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही तरुणांना मोकळे आकाश देण्याबरोबच तरुणांसमोरील प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या इतिहासात तुम्ही तुमचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहू शकता. म्हणूनच मी तुम्हाला २१व्या शतकातील भारतातील सर्वात भाग्यवान पिढी मानतो. तुम्ही असे काम करा की पुढील काळातील पिढी तुमची न चुकता आठवण काढेल, असे मोदी म्हणाले.
PM Modi : युवकांना इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; जोशपूर्ण उदाहरणं देत मोदींनी तरूणांना दिला ‘बूस्टर’
आज देशाचा मूड आणि देशाचा अंदाजही तरुण आहे आणि जो तरूण असतो तो कधीच मागे चालत नाही तर, तो लीड करण्याचे काम करतो. भारतातील युवकांना नवीन संधी मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम केले जात आहे. जगात स्कील फोर्स म्हणून भारताला ओळख मिळाली आहे. लोकशाहीत तरुणांचा सहभाग जितका जास्त असेल तितके देशाचे भवितव्य चांगले असेल. आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका हे सांगत तरूणांनी नशेपासून दूर राहावं असे मोदी म्हणाले.