Download App

राजकीय रणधुमाळी! विखे-पवार रविवारी नगरमध्ये, चर्चांना उधाण

Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यामुळे कार्यक्रम राजकीय असो की शासकीय असो अथवा खासगी, नेतेमंडळी राजकीय भाष्य करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच अहमदनगरमध्ये उद्या रविवारी (दि.2) राजकीय रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar)नगरमध्ये येणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अनेक नेते या कार्य्रक्रमासाठी नगरमध्ये असणार आहेत. तर दुसरीकडे उद्याच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil)देखील नगरमध्ये असणार आहे. ग्रामसेवक पुरस्कार वितरणासाठी (Distribution of Gram Sevak Awards)विखे नगरमध्ये असणार आहेत. दरम्यान दोन बडे राजकीय नेते एकाच दिवशी नगरमध्ये उपस्थित असल्याने ते नेमकं काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.(politics Sharad pawar radhakrishna vikhe patil in Ahmednagar NCP BJP)

बुलढाण्यातील अपघातावर PM मोदीही हळहळले; तर फडणवीस म्हणतात, हा अपघात…

रविवारी (दि.2) सकाळी दहा वाजता अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे (Maharashtra State Primary Teachers Association)राज्यस्तरीय महामंडळाचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील दहा हजार शिक्षक येणार आहेत. अशी माहिती राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे यांनी दिली. या अधिवेशनास विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिक्षक नेते माधवराव पाटील, राजाराम वरुटे, बाळासाहेब काळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Diamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला पुन्हा इतिहास! ‘लॉसने डायमंड लीग’वर कोरलं भारताचं नाव

दुसरीकडे सातत्याने विरोधकांवर निशाणा साधणारे व मविआवर आरोप-प्रत्यारोप करणारे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील रविवारी नगरमध्ये असणार आहेत. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी विखे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी भाजपच्या नेत्यांसह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेतेमंडळींना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान दोन्ही कार्यक्रम हे एकाच दिवशी असल्याने प्रशासनावर देखील मोठा ताण असणार आहे. बडे राजकीय नेते मंडळी जिल्ह्यात येत असल्याने यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शरद पवार यांची प्रमख उपस्थिती असलेला शिक्षकांच्या अधिवेशनाचा कार्यक्रम हा सकाळी 10 वाजता असणार आहे. तर दुसरीकडे विखे प्रमुख अतिथी असलेल्या पुरस्कार वितरण सोहळा हा कार्यक्रम 11 वाजता असणार आहे.

कार्यक्रमाचे जरी निमित्त असले तरी मात्र आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय नेते मंडळी हे नगर दौऱ्यावर आहेत. यातच सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर नेतेमंडळी काय बोलणार तसेच सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच दिवशी जिल्ह्यात असल्याने नेमकं काय घडामोड घडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

Tags

follow us