Diamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला पुन्हा इतिहास! ‘लॉसने डायमंड लीग’वर कोरलं भारताचं नाव

Diamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला पुन्हा इतिहास! ‘लॉसने डायमंड लीग’वर कोरलं भारताचं नाव

Lausanne Diamond League 2023 : ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (neeraj chopra)पुन्हा एकदा अनोखा विक्रम केला आहे. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League 2023)सुवर्णपदकावर कब्जा केला. डायमंड लीगचे त्याचे एकूण चौथे सुवर्णपदक आहे. अलीकडेच त्याने दोहा डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या या यशामुळे देशाच्या शिरपेचात आणखी एकदा मानाचा तुरा खोवला आहे.(neeraj chopra Diamond League 2023 won gold created history javelin throw)

Breaking : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू

या सामन्यात नीरजची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला. त्यानंतर मात्र नीरजने शानदार पुनरागमन करत 87.66 मीटर फेक करुन अव्वल स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भाला फेकून अव्वल स्थानी होता.

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

नीरजने यंदाच्या मोसमात नेत्रदिपक कामगिरी करत पुनरागमन केले आहे. नीरज 5 मे रोजी दोहा डायमंड लीगनंतर इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी झाला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या एफबीके गेम्स (FBK Games) आणि पावो नूरमी गेम्स (Paavo Nurmi Games) या दोन्ही स्पर्धांमधून नीरजने दुखापतीमुळे माघार घेतली होती.

बसमधील प्रवाशांची नावं आली समोर ; 26 जणांचा मृत्यू 8 सुखरुप…. बसचा केवळ सांगाडाच उरला…

नीरज चोप्राने या लीगच्या पाचव्या फेरीमध्ये 87.66 मीटर भाला फेकून हे विजेतेपद पटकावले आहे. त्याने या फेरीत नीरजच्या खेळाची सुरुवात फाऊलने केली आहे. त्यानंतर 83.52 मीटर, त्यानंतर 85.04 मीटर भाला फेकला. चौथ्या फेरीत नीरजकडून आणखी एक फाऊल झाला, मात्र त्याच्या पुढच्याच फेरीमध्ये नीरजने 87.66 मीटर भाला फेकला. नीरजचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता. पाचव्या फेरीत नीरजची बरोबरी कोणताही खेळाडू करु शकला नाही. त्यामुळेच नीरजने डायमंड लीगचा किताब पटकावला आहे.

देशाचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2023 मध्ये 90 मीटरचा टप्पा पार करण्याचं ध्येय असल्याचे सांगितले आहे. याबाबत आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे नीरजने सांगितले आहे. नीरजची आतापर्यंत 89.94 मीटरची सर्वोत्कृष्ट भालाफेक आहे. त्यावेळी त्याने स्टॉकहोम पीटर्ससह दुसरं स्थान पटकावलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube