समृद्धी महामार्ग बस अपघात : प्रवाशांचे फक्त सांगाडे, ओळख कशी पटविणार ?

  • Written By: Published:
समृद्धी महामार्ग बस अपघात : प्रवाशांचे फक्त सांगाडे, ओळख कशी पटविणार ?

Samruddhi Highway Bus Accident News: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. त्यात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला आहे. ट्रव्हल्स कंपनीकडे प्रवाशांची नावे असल्यामुळे या बसमधील मृतांची नावे समजली आहे. मृतांची नावे समजली असली तरी नातेवाइकांना आपल्या व्यक्तीचा मृतदेह ओळखणे आता शक्य नाही.त्यामुळे मृतदेहाचा डीएनए करून मृतदेह नातेवाइकांचा ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे मृतदेह लगेच नातेवाइकांना मिळणार नाही. (Samriddhi Highway Bus Accident: Only skeletons of the dead, how to identify them?)

विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MH-29-BE-1819 ही बस नागपूरहून पुणेच्या दिशेला निघाली होती. बसमध्ये 30 प्रवासी आणि ट्रॅव्हल्सचे 3 कर्मचारी होते. यातील 26 जणांचा मृत्यू झाला तर 8 प्रवासी सुखरुप आहे.पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी पाच ते सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह होते. या अपघात बस जळून खाक झाली आहे. त्यामुळे प्रवासांच्या हाडाचे सांगडे बाकी राहिले आहे. पोलिस व इतरांनी हे हाडाचे सांगडे रुग्ण वाहिकेतून रुग्णालयात नेमण्यात आले आहे.

बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले, टायर फुटून बस समृद्धी महामार्गावर एका खांबाला बस धडकली, असे बसचालक सांगत आहे. बस उलटल्याने डिझेल टँक फुटला. त्यामुळे बसला आग लागली. त्यातून प्रवाशांना बाहेर पडता आलेले नाही. त्यात प्रवाशांचा कोळसा झालेला आहे. सांगड्यावरून त्यात तीन लहान मुले आहे. प्रवाशांची ओळख पटवून ते नातेवाइकांच्या ताब्यात देणे ही मोठी अडचण असल्याचे कडासने म्हणाले. नातेवाइक व मृतांचे डीएनए तपासून हे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.त्यामुळे नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यासाठी वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे.

भीषण अपघातानंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. ट्रव्हल्स कंपनीकडून प्रशासनाला प्रवासांची यादी मिळाली आहे. परंतु ती यादी ही अपूर्ण आहे. त्यात काही प्रवाशांचे पहिले नाव आहे. पूर्ण नाव नाहीत. काही जणांचे पूर्ण नावे आहेत. प्रवाशांचे मोबाइल नंबर मात्र आहे. त्यातून नातेवाइकांना संपर्क साधून माहिती देण्यात आलेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube