Download App

केडगाव पोस्ट ऑफिस विभागात अल्पबचत योजनेत अव्वल

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः अहमदनगर डाक विभागामध्ये आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांचा विशेष गौरव सोहळा झाला.

पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल व अहमदनगर जिल्ह्याचे रामचंद्र जायभाये, पोस्टल सर्विसेस डायरेक्टर सिमरन कौर (पुणे विभाग), अहमदनगर डाकघर अधीक्षक जी हनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएसआरडी कॉलेजच्या हॉलमध्ये सोहळा झाला. भारतीय पोस्ट विभागाच्या विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जवळपास सत्तर कर्मचारी, अधिकारी,अल्पबचत अभिकर्ते, ग्रामीण डाकसेवक यांना याप्रसंगी गौरविण्यात आले.
केडगाव पोस्ट ऑफिसला दोन योजनेत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

अहमदनगर आरएस पोस्ट ऑफिसच्या वतीने अल्पबचत योजनेचे आर्थिक वर्षात 5999 नवीन अकाउंट उघडण्याचे विक्रमी काम केल्याने विभागात प्रथम पारितोषिक देऊन केडगावचे पोस्टमास्टर संतोष यादव, तर पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शुभांगी योगेश मांडगे यांना डिपार्टमेंटल कर्मचारी गटात प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सिमरन कौर म्हणाले, अहमदनगर विभाग विविध योजनेत उल्लेखनीय काम असून यापुढील काळातही सर्वानी अधिक जोमाने काम करावे व पुढील आर्थिक वर्षात रिजनमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी असणारा फिरता चषक पुन्हा अहमदनगर विभागास मिळावा याकरिका सर्वांनी प्रयत्न करावेत. यावेळी संदिप हदगल, कमलेश मिरगणे, मोनाली हिंगे, बाळासाहेब बनकर, संदिप कोकाटे, दत्तात्रय वराडी, सोमनाथ तांबे, अमित देशमुख अमोल भूमकर उपस्थित होते.

Tags

follow us