Download App

Prajakt Tanpure : भगत यांच्यावर गुन्हा मग कर्डिलेंवर कारवाई का नाही? तनपुरेंचा सवाल

  • Written By: Last Updated:

Prajakt Tanpure : राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला आहे. अहमदनगरच्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी 13 सप्टेंबर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून त्यांनी ही टीका केली आहे.

समृद्धीवरील अपघात थांबविण्यासाठी CM शिंदे जर्मनी दौऱ्यावर; थेट बर्लिनमधून आणणार मेगा प्लॅन

भगत यांना कर्डिले यांनी धमकावले…

बुऱ्हाणनगर येथील देवीच्या मंदिराचे पुजारी तसेच वकील अभिषेक भगत यांना भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी धमकावले आहे. या धक्कादायक प्रकराची पोलीस प्रशासन दखल घेत नाही म्हणून न्यायालयाने आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.

Maratha Reservation साठी नारायण राणेंनी सांगितला फॉर्म्युला, म्हणाले सरसकट कुणबी दाखले…

कर्डिलेंवर अनेक गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर तडीपारीची कारवाई का होत नाही, असा सवाल संतप्त सवाल राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच येत्या आठ दिवसांत गुन्हा दाखल करून घेतला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल व आम्ही उपोषण करू असे ते म्हणाले.

अॅड. अभिषेक विजय भगत यांच्यावर तोफखाना पोलिस स्टेशन येथे खोटा अँट्रोसिटी दाखल झालेला गुन्हा चौकशी करून रद्द करावा अशी मागणी आज राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सह नगर तालुका आणि नगर शहरातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

बुऱ्हाणनगर मंदिराच्या पुजाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

अहमदनगरच्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी 13 सप्टेंबर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सावेडी येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात तुळजाभवानी मंदिराच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी होती. सुनावणीनंतर पुढील तारीख मिळाल्याने फिर्यादी व साक्षीदार हे कार्यालयाच्या पार्किंग मध्ये जवळून जात असताना अभिषेक भगत (रा. बुऱ्हाणनगर) यांनी विनोद राजू साळवे (रा. बुऱ्हाणनगर) यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. साळवे यांच्या फिर्यादीवरुन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us