Maratha Reservation साठी नारायण राणेंनी सांगितला फॉर्म्युला, म्हणाले सरसकट कुणबी दाखले…

Maratha Reservation साठी नारायण राणेंनी सांगितला फॉर्म्युला, म्हणाले सरसकट कुणबी दाखले…

Maratha Reservation : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपलं मत मांडलं आहे. यावेळी नारायण म्हणाले की, 17 दिवसांच्या मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतलं. मला सरकारला सांगायचं आहे की, मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. यापूर्वी मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र त्यात कायदेशीर बाबीमुळे कमतरता राहिल्या.

INDIA : उमर अब्दुलांच्या फॉर्म्यूल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी? महाराष्ट्रासह, बिहारचं समीकरण बिघडणार…

सरसकट कुणबी दाखले देऊ नये…

त्यात आता मराठा आरक्षणाची मागणी करताना मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली जात आहे. पण सरसकट असं करू नका हा निर्णय घेताना राज्यसरकारने घटनेच्या कलम 15-4 आणि 16-4 याचा आभ्यास करावा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्या मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण द्यावं.

MLAs Disqualification : विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेच्या सुनावणीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न; अॅड असीम सरोदेंचा आरोप

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी 96 कुळी मराठ्यांची नाही. त्यामुळे घटनेत नमुद केल्याप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्यांचा सर्व्हे व्हावा. राज्यात 38 टक्के मराठा आहेत. त्यात जे गरिब, शैक्षणिक पात्रता घेऊ शकलेले नाही. त्यांना आरक्षण देण्यात यावं. मात्र कोणाचंही आरक्षण काढून घ्यावं. ते इतरांना द्यावं अशा मताचा मी नाही. ते चूकीच होईल.

16 टक्के आरक्षण दिलं होतं. तेव्हा मी म्हटलं होतं की, घटनेतील तरतुदीप्रमाणे आरक्षण द्यायचा अधिका राज्यसरकारला आहे. मात्र कोणाचाही यात अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यांना इतिहास माहित आहे त्यांनीच यावर बोलावं. तसेच ज्यावेळी इतरांना आरक्षण मिळालं त्यावेळी मराठाचं मुख्यमंत्री होते. त्यांनी इतरांना आरक्षण देताना द्वेष केला नाही त्यामुळे मराठे आरक्षण मागता असताना त्यांचा देखील व्देष करू नका. असं मत यावेळी नारायण राणे यांनी मांडलं. त्यामुळे ते देखील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube