समृद्धीवरील अपघात थांबविण्यासाठी CM शिंदे जर्मनी दौऱ्यावर; थेट बर्लिनमधून आणणार मेगा प्लॅन
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील (Samrudhi Highway) अपघातांमुळे राज्य सरकारला मोठ्या टीकांना सामोरे जावे लागले. यावर सातत्याने होणारे अपघात आणि त्यात होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी पावलं उचलण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता हे समृद्धी महामार्गावरील अपघात थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जर्मनीला जाणार आहेत. (Chief minister Eknath Shinde, a few ministers and officials from various departments are expected to visit Berlin in Germany)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काही मंत्री आणि विविध विभागांचे अधिकारी जर्मनीतील बर्लिनला भेट देणार आहेत. तिथल्या ऑटोबान या फेडरल कंट्रोल्ड-एक्सेस हायवे सिस्टमचा अभ्यास करण्यासाठी सरकारने हा दौरा आखला आहे.शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बर्लिनला भेट देण्याची शक्यता आहे. या भेटीसाठी राज्य सरकारने जर्मनीतील भारतीय दूतावासाला पत्र लिहिले असून येत्या काही दिवसांत तारीख निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
Maratha Reservation साठी नारायण राणेंनी सांगितला फॉर्म्युला, म्हणाले सरसकट कुणबी दाखले…
मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ऑटोबान हायवे सिस्टीमला भेट देण्याची त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. त्यांच्या या दौर्याचा उद्देश जर्मनीमधील महामार्गांचे डिझाइन, व्यवस्थापन आणि देखभालीचा अभ्यास करणे हा असणार आहे. समृद्धी महामार्ग आणि महाराष्ट्रातील इतर आगामी महामार्गांच्या व्यवस्थापनाची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्नही या दौऱ्यातून असणार आहे. समृद्धी महामार्ग बांधला तेव्हा शिंदे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मंत्री होते. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली इतर महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेतले जात आहेत.
दानवेंच्या चिठ्ठीने कार्यक्रम! ‘मी खानदानी मराठा, गद्दारी रक्तात नाही’; जरांगेंनी CM शिंदेंसमोरच सांगितलं
लंडन दौऱ्यावरही जाण्याची शक्यता :
दरम्यान, लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय आणि महाराष्ट्राचे पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठीही मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सामंजस्य करारावर 3 ऑक्टोबर 2023 रोजी लंडनमध्ये स्वाक्षरीहोणार आहे. हा सामंजस्य करार झाल्यानंतर छत्रपती महाराजांचे वाघ नखे भारतात येणार आहेत. 1659 मध्ये विजापूरचा सरदार अफझल खानला मारण्यासाठी वापरण्यात आलेली ही वाघनखे पुन्हा भारतात येणार आहेत.