Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure ) यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर बँकेने कर्जांचे वितरण करताना हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात आमदार तनपुरे यांना समन्स बजावले आहे. त्यांच्यासह न्यायालयाने त्यांचे वडील प्रसाद तनपुरे, काँग्रेस नेते रणजीत देशमुख, शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर, विकासक जुगलकिशोर तापडिया व उद्योजक पद्याकर मुळे यांनाही समन्स बजावले.
नेमकं प्रकरण काय?
माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने 13 कोटी 37 लाख रूपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी आता मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे पितापुत्रांसह अन्य आमदारांना 12 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
ठरलं! बॉलिवूड ‘क्विन’ लोकसभेच्या मैदानात उतरणार; चर्चांना पहिल्यांदाच मिळाला अधिकृत दुजोरा
उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिखर बँक कर्ज वितरण घोटाळा प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. त्या एफआयआरच्या आधारे ईडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काही महिन्यांपूर्वी ईडीने दोन पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्याची न्या. रोकडे यांनी दखल घेतली.
कोट्यवधींचा गैरव्यवहार…ईडीचा आरोप
राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री दरम्यान कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाला. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंगही झालं असे ईडीचे म्हणणे आहे. तसेच प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड अँग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेडला केवळ 12 कोटी 95 लाख रुपयांना विकला. शासनमान्य मूल्यांकनकार अधिकाऱ्याने या मालमत्तेची किमान किंमत 26 कोटी 32 लाख रुपये ठरवलेले असताना केवळ 12 कोटी 95 लाख रुपयांत या कंपनीला कारखान्याबरोबरच 110 एकर जमीनही मिळाली’, असे “इडी’ने आरोपपत्रात म्हटले होते.