Ahmednagar News : अल्पवधीत श्रीमंतीचं आमिष, सर्वसामान्य अडकताय शेअर मार्केट ट्रेडिंग कंपन्यांच्या जाळ्यात…

Ahmednagar News : अल्पवधीत श्रीमंतीचं आमिष, सर्वसामान्य अडकताय शेअर मार्केट ट्रेडिंग कंपन्यांच्या जाळ्यात…

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शेवगाव तालुक्यात अनेकांनी शेअर मार्केटची दुकाने थाटली असून, यामध्ये व्यापाऱ्याबरोबरच आता सर्वसामान्य नागरिक देखील मोठी रक्कम गुंतवू लागले आहे. पाच, आठ ते दहा टक्के महिनाकाठी व्याज मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक गुंतवणूक करू लागले आहे. मात्र झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे आणि येथेच अनेकांची फसवणूक झाल्याचे उदाहरण देखील पाहायला मिळत आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; 18 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

शेअर बाजारचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचे आकलन करून योग्य गुंतवणुकीद्वारे पैसे कमावणे हे आपणास माहीत आहे. मात्र शेअर मार्केटमधील काही माहित नसले तरी याठिकाणी गुंतवणूक केली की, मोठा नफा मिळवता येतो अशा कल्पनेतून आता सर्वसामान्य शेअर मार्केटच्या एका नव्या फंद्यात गुरफटत चालले आहे.

Operation Valentine Teaser : एअरफोर्स पायलट वरूण-मानुषीने जिंकली मनं; ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा देशभक्तीपर टीझर रिलीज…

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून अल्प कालावधीत भरमसाठ परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या विविध कंपन्या शहरांमध्ये होत्या. मात्र याचेच लोन आता ग्रामीण भागामध्ये पसरत असून आता ग्रामीण भागातही अनेकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली दुकाने सुरु केली आहे. या ट्रेडिंग कंपन्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर महिन्याला पाच, आठ ते दहा टक्के व्याज देत आहे. बँक तसेच पतसंस्था यांच्या व्याजाची तुलना केली असता बॅंकांमध्ये ठरावीक कालावधीच्या मुदत ठेवीवर सरासरी 7 ते 8 टक्‍के व्याजदराने व्याज दिले जात आहे. पतसंस्थांमध्ये 8 ते 10 टक्के व्याज दिले जाते. साधारणत: 12 ते 13 महिन्यांच्या मुदत ठेवीवर एक लाख रुपयांसाठी सातशे ते आठशे रुपये महिन्याला व्याज मिळते.

NCP : सत्तेत आले पण श्रद्धा गोविंदबागेवरच! अजितदादा अन् आमदारांची ‘रेशीमबागेकडे’ पाठ

तर दुसरीकडे या शेअर मार्केट ट्रेंडिंग कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांनागुंतवणुकीवर महिन्याला पाच, आठ ते दहा टक्के व्याज देत आहे. म्हणजेच एखाद्याने एक लाख रुपये जर गुंतवले तर त्याला महिन्याला आठ टक्के व्याजदराने महिना आठ हजार रुपये दिले जाते. याच आमिषाला बळी पडून आता ग्रामीण भागामध्ये बचत, ठेव पावत्या मोडून, शेतमाल विक्री करून अशा कंपन्यांमध्ये शेवगाव तालुक्‍यातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने पैसे गुंतवणूक करीत आहेत. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये मोठं मोठे व्यापारी देखील सहभागी झाले आहे.

मात्र असे असले तरी धक्कादायक बाब म्हणजे अशा कंपन्यांकहून गोळा झालेले भांडवल कुठे, कसे गुंतवणूक करतात? इतका परतावा कसे देतात याबाबतची माहिती अनेकांना नाही. तसेच, कंपनीचे रजिस्ट्रेशन, नोंदणीबाबत देखील तिच परिस्थिती आहे. या केवळ शेअर मार्केटशी निगडित कंपन्या आहेत एवढीच माहिती गुंतवणूकदारांना आहे. सध्या गुंतवण्यात आलेल्या पैशाला महिन्याकाठी चांगले पैसे येत असल्याने सर्वच गुंतवणूकदार खुश आहेत, परंतु हि जोखीम नविन गुंतवणूकदाराला कितपत पथ्यावर पडेल हे मात्र काळच ठरवणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube