Operation Valentine Teaser : एअरफोर्स पायलट वरूण-मानुषीने जिंकली मनं; ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा देशभक्तीपर टीझर रिलीज…

Operation Valentine Teaser : एअरफोर्स पायलट वरूण-मानुषीने जिंकली मनं; ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा देशभक्तीपर टीझर रिलीज…

Operation Valentine Teaser : ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ या चित्रपटाचा टीझर (Operation Valentine Teaser) नुकताच रिलीज झाला. यामध्ये दक्षिणात्य अभिनेता वरून तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर या ॲक्शन फिल्ममध्ये एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपटाचा मोशन टीचर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे.

Uddhav Thackeray : ‘हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटण्याची गरज मला नाही’; ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?

या चित्रपटाचा टीझरमध्ये वरून तेज हा शत्रु विरुद्ध लढण्यासाठी वायुसेनेच्या पायलटच्या टीमचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसाठी तो त्याचे प्राण धोक्यात घालताना आहे. यामध्ये एक संवाद देखील ऐकायला येत आहे की, ‘हा देश गांधीजींसोबतच सुभाषचंद्र बोस यांचा देखील आहे.’ ज्यामध्ये पाठीमागे वंदे मातरनचं संगीत ऐकू येत आहे.

Shivrayancha Chhava: सूर्यासम तेजस्वी अजेय योद्धा…,’शिवरायांचा छावा’चा थरारक फर्स्ट लूक बघाच!

या चित्रपटाची कथा भारतीय वायुसेनेच्या सैनिकांकडून देशाच्या सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांच्या सामन्यांची कथा आहे. ज्यामध्ये ॲक्शन रोमान्स आणि वरून आणि मानुषीची जबरदस्त केमिस्ट्री देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या टीझर नंतर चित्रपटाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Dunki Drop 6: किंग खानच्या ‘डंकी’तील ‘बंदा’ गाणं रिलीज ! शाहरुखच्या अ‍ॅक्शन मोडने वेधलं लक्ष

‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ हा चित्रपट सोनी पिक्चर्स अँड इंटरनॅशनल प्रोडक्शन तसेच संदीप मुड्डा यांच्या रेनेसो पिक्चर्स द्वारे निर्मित करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये गॉड ब्लेस एंटरटेनमेंट आणि नंदकुमार अब्बिनेनी हे सहनिर्माते असणार आहेत. तर दिग्दर्शक शक्ती प्रताप सिंह हाडा हे या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर हाडा यांनी या चित्रपटाचा लेखन केलं आहे. तसेच या लेखनामध्ये आमिर खान आणि सिद्धार्थ राजकुमार यांचे देखील सहभाग आहे हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 ला तेलगू आणि हिंदी मध्ये देखील रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज