The Great Indian Family हा एकत्रित कुटुंबाचं सेलिब्रेशन; विकीने सांगितली स्टोरी…

The Great Indian Family हा एकत्रित कुटुंबाचं सेलिब्रेशन; विकीने सांगितली स्टोरी…

The Great Indian Family : ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family ) या चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये विकी कौशलने हा चित्रपट म्हणजे एकत्र कुटुंबाचं सेलिब्रेशन असल्याचं सांगितलं.

Apple Event 2023 : फक्त आयफोन नाही अ‍ॅपल इव्हेंटमध्ये लाँच झाले ‘हे’ गॅझेट्स जाणून घ्या…

काय म्हणाला विकी कौशल?

‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट साधा, लहान शहरातील गोष्ट आहे. जी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करू जाईल. ही गोष्ट भारतातील एकत्र कुटुंबातील आहे. ज्यांच्याामध्ये न तुटणारे बंध आहेत. ज्या कुटुंबांमध्ये सर्व गोष्ट एकमेकांना शेअर केल्या जातात. मात्र काही परिस्थिती या नात्यांच्या बंधांची कशी परिक्षा घेताता. त्यात हे कुटुंब कसे खंबीर उभे राहतात? हे या चित्रपटामध्ये दाखवण्यत आलं आहे. असं विकीने सांगितलं.

Sanjay Raut : फडणवीस सत्तेत आले अन् राज्यात.. राऊतांचा गंभीर आरोप

ट्रेलरवरून द ग्रेट इंडियन फॅमिली हा एक चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याच कळतंय. मानुषी छिल्लर एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारताना बघायला मिळणार असून जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार आहे. प्रेक्षक त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती असून प्रीतमने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

ट्रेलरमधून मानुषीच्या करिष्माने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या तेजस्वी मोहकतेसह ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ एक अनोखा चित्रपट असणार यात शंका नाही. मानुषी छिल्लरचे बॉलीवूडमधील काम बघता येणाऱ्या चित्रपटात ती नक्कीच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून एक उत्तम चित्रपट सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube