ठरलं! बॉलिवूड ‘क्विन’ लोकसभेच्या मैदानात उतरणार; चर्चांना पहिल्यांदाच मिळाला अधिकृत दुजोरा

ठरलं! बॉलिवूड ‘क्विन’ लोकसभेच्या मैदानात उतरणार; चर्चांना पहिल्यांदाच मिळाला अधिकृत दुजोरा

मंडी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वडील अमरदीप यांनी ती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पहिल्यांदाच अधिकृतपणे दुजोरा दिला. मात्र, ती कोठून निवडणूक लढवणार याचा निर्णय भाजप घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Bollywood actress Kangana Ranaut will contest the upcoming Lok Sabha elections.)

दोन दिवसांपूर्वीच तिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू येथील घरी भेट घेतली होती. या भेटीनंतर कंगना निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेंनी आणखी जोर आला होता. काही महिन्यांपूर्वीच कंगना रणौतने गुजरातमधील द्वारका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना “जर देवाचा आशीर्वाद असेल तर आपण नक्कीच निवडणूक लढवणार” असे वक्तव्य केले होते.

NCP : सत्तेत आले पण श्रद्धा गोविंदबागेवरच! अजितदादा अन् आमदारांची ‘रेशीमबागेकडे’ पाठ

गेल्या आठवड्यात हिमाचलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सामाजिक भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यातही कंगना सहभागी झाली होती आणि संघाची विचारधारा तिच्या विचारसरणीशी जुळते असे म्हटले होते. आता वडील अमरदीप यांनी कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.

मंडी किंवा चंदीगडमधून उतरणार लोकसभेच्या मैदानात?

कंगना राणौत ही मूळची मंडी जिल्ह्यातील सरकाघाट विधानसभा मतदारसंघातील भांबला गावची रहिवासी आहे. तर ती आणि तिचे कुटुंब सध्या मनालीमध्ये वास्तव्याला असते. पण कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून किंवा चंदीगडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. पण ती कोठून निवडणूक लढवणार याचा निर्णय भाजप घेईल, असेही वडिलांनी स्पष्ट केले आहे.

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसची कोर्टात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार?

अनेक मोठे कलाकार भाजपचे खासदार :

याआधीही भाजप चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना निवडणुकीत उतरवले आहे. यातील काही मोठी नावे म्हणजे, हेमा मालिनी, सनी देओल, मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांसारखे खासदार. याशिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मोदी सरकारचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या स्मृती इराणी याही अभिनय क्षेत्राशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता कंगना राणौतला उमेदवारी दिल्यास फार मोठे आश्चर्य वाटणार नाही. त्यातही कंगना मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपची समर्थक राहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube