प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

अहमदनगरः दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. या भेटीत जगभरात १४० देशामध्ये संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या वतीने ब्रह्माकुमार डॉ. गंगाधर भाई यांच्या हस्ते निराकार परम पिता परमात्मा शिवाची प्रतिमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली आहे. या भेटीने […]

Harde

Harde

अहमदनगरः दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. या भेटीत जगभरात १४० देशामध्ये संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे.

यावेळी संस्थेच्या वतीने ब्रह्माकुमार डॉ. गंगाधर भाई यांच्या हस्ते निराकार परम पिता परमात्मा शिवाची प्रतिमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली आहे. या भेटीने राष्ट्रपती मुर्मू या भारावून गेल्या आहेत. तर ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे कामकाज कसे चालते. संस्थेची इतर माहिती या वेळी राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे.

यावेळी ब्रह्माकुमार डॉ .दिपक हरके, ब्रह्माकुमारी डॉ.लीनादीदी व विहान हरके उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले.

Exit mobile version