Prakash Ambedkar : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.
ते पुढं म्हणाले की जे ज्वलंत प्रश्न आहेत यावर सभागृहात कोणतीही चर्चा होत नाही. ज्या प्रश्नांचे महत्त्व नाही अशाच प्रश्नांची चर्चा होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात कुठही दिसत नाहीत. किंवा दिल्लीत ज्या युवकांनी संसदेत उडी घेतली. त्या बेरोजगारीचा प्रश्नही दिसत नाही. फक्त पाट्या टाकायचे कामकाज सुरु आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
अजितदादांनी फक्त सांगावं, ‘मी’ बारामतीतून लढण्यास तयार… : महादेव जानकरांचा शड्डू
उत्तर प्रदेशातून ईव्हीएम मशीनसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केलेल्या आहे. मात्र निवडणूक आयोग त्या तक्रारी बघत नाही, पाहत नाही. त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नेमक मी सिद्ध केल्याशिवाय हा ईव्हीएम घोटाळा आहे असं म्हणणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
‘रामदास कदम माणूसच घाणेरडा’; भास्कर जाधवांची कदमांवर जळजळीत टीका
नरेंद्र मोदी हे देशाला प्रचंड मोठा धोका आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी वर्षभरात किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं. आणि कुठे झालं हे सुद्धा जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास वाटेल. मी विचारलेल्या प्रश्नाचं मोहन भागवत यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांची वर्षभरात मोदी यांच्यासोबत भेट झाली नाही असंच यावरून सिद्ध होतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.