Download App

President Draupadi Murmu घेणार शनि दर्शन; ‘या’ दिवशी येणार अहमदनगर दौऱ्यावर

  • Written By: Last Updated:

President Draupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu) अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी त्या शनिशिंगणापूर येथे शनि दर्शन घेणार आहेत. दरम्यान देशाच्या सर्वोच्च पदाची व्यक्ती जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून देखील दौऱ्याचे योग्य ते नियोजन केले जात आहे. दौऱ्यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

‘या’ दिवशी येणार अहमदनगर दौऱ्यावर…

राष्ट्रपती मुर्मू या गुरूवारी 30 नोव्हेंबर या दिवशी अहमदनगर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर शनिशिंगणापूर येथील जनसंपर्क कार्यालयात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पूर्वतयारी आढावा बैठकी पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार उपस्थित होते.

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने अडचणीत का येत आहेत? पाहा व्हिडिओ | LetsUpp

असा असणार आहे राष्ट्रपतींचा दौरा…

राष्ट्रपती दौपदी मुर्मू या गुरूवारी 30 नोव्हेंबर या दिवशी शनिशिंगपूर येथे पोहचल्यानंतर त्या सर्वप्रथम उदासी महाराज मठात आभिषेक करणार असून त्यांनतर शनी देवास तेल अर्पण करून अभिषेक करून त्या शनिदेवाचे दर्शन घेणार आहे. त्यांनतर त्या शनिमंदिरातील भोजनालयातील महाप्रसाद घेणार आहेत.

‘Tiger 3’ चा दिवाळीत धमाका; मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भाईजानने मानले चाहत्यांचे आभार

राष्ट्रपतींचा दौरा… प्रशासन अलर्ट

दरम्यान देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच अद्ययावत आरोग्य पथकासह सर्व विभागांना सुविधांसह सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीस देवस्थानचे विश्‍वस्त, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

Tags

follow us