President Draupadi Murmu साईचरणी लीन; साईबाबांचं दर्शन घेणाऱ्या ठरल्या सातव्या राष्ट्रपती
President Draupadi Murmu at Shirdi : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराला भेट देऊन साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रपती या शिर्डी दौऱ्यावर असल्याने शिर्डीला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी मोठा बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात आला होता. ( President Draupadi Murmu Visit Saibaba Shirdi in Ahmedngar )
मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
आज दि 7 जुलै शुक्रवारी रोजी राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने दुपारी शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. दरम्यान त्यांच्या आगमनापूर्वी शिर्डीमध्ये जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली होती. यावेळी दोन दिवस आधीपासूनच प्रशासनाने तयारी सुरु केली होती. तसेच राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी साई संस्थानकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली होती.
पोलीसच झाले चोर, खाद्यतेल लुटल्याप्रकरणी पोलिसांसह पाच जणांना अटक
आजवर शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सात राष्ट्रपतींनी हजेरी लावली होती. साईबाबांच्या समाधीच दर्शन घेणाऱ्या मुर्मू या सातव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. दरम्यान यापूर्वी निलम संजीव रेड्डी, शंकरदयाळ शर्मा, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद यांनी शिर्डीत येत साईंचे दर्शन घेतले होते.
आज द्रौपदी मुर्मू यांनी साईंचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर, महाराष्ट्राचे राज्यपाल मा.रमेश बैस, पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रपती शिर्डीत येणार असल्याने एक दिवस आधीपासूनच शिर्डीमध्ये प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती.