पोलीसच झाले चोर, खाद्यतेल लुटल्याप्रकरणी पोलिसांसह पाच जणांना अटक

पोलीसच झाले चोर, खाद्यतेल लुटल्याप्रकरणी पोलिसांसह पाच जणांना अटक

पाकिस्तानला (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्य माणसांचं जगण अवघड झालं. इतकचं नाहीतर आता पोलीसही (police) चोरीच्या टोळ्यात सामिल असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं आता रक्षकचं भक्षक झाल्याची स्थिती पाकिस्तामध्ये आहे. नुकतीच चोरीची एक घटना कराचीत उघकीस आली. त्यात देशात विकल्या जाणार्‍या महागड्या खाद्यतेलाची चोरी आता पोलीसच करू लागल्याचं समोर आलं. कराची पोलिसांनी पोलीस व्हॅनमधील स्वयंपाकाच्या तेलाचा साठा लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. ( Pakistan the police became thieves five people were arrested along with the police for stealing cooking oil)

गोदामाच्या मालकासह पोलीस कर्मचाऱ्याला अटक

गार्डन मुख्यालयाजवळ चोरी करतांना पोलिसांनी एका चोरांच्या टोळीला अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोदामाचा मालक, एक गोदाम कर्मचारी आणि एका पोलिसाचा समावेश आहे. चोरांच्या टोळीत पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्यानं एकच खळबळ उडाली. वाढत्या महागाईमुळं पोलिसांवर चोरी करण्याची वेळ आल्याचं पुढं आलं. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलाचा साठा असलेल्या मालवाहू वाहनातून चोर खाद्यतेल चोरायचे. गेल्या महिनाभरात डझनभर चोरीच्या घटना घडल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरोडा टाकल्यानंतर आरोपी खाद्यतेल गोदामात लपवून ठेवत असायचे, असं पोलिसांनी सांगितलं.

Mithun Chakraborty यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांनंतर 3 वर्षानी आईचंही निधन 

मोस्ट वाँटेड तीन आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशरफ उर्फ ​​अछो आणि आसिफ यांच्यावर चोरांच्या टोळीचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे, त्यांनी कराचीच्या पॉश भागात अनेक दरोडे केले होते. क्लिफ्टनचे पोलीस अधीक्षक (एसपी) अहमद चौधरी यांनी सांगितले की, ​​अछो टोळीतील तीन दरोडेखोर पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड आहेत.

कारवाईदरम्यान, पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने आणि इतर महागड्या वस्तू सापडल्या, ज्याची एकूण किंमत लाखो डॉलर्स आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीत वापरलेली हत्यारेही जप्त केली आहेत.

क्लिफ्टन एसपीने दावा केला की या टोळीमध्ये तीन सदस्य आहेत आणि त्यांचा एक साथीदार खुर्शीद यापूर्वीच अशाच गुन्ह्यांमध्ये गुंतल्याबद्दल तुरुंगवास भोगत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube