Mithun Chakraborty यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांनंतर 3 वर्षानी आईचंही निधन
Mithun Chakraborty Mother Passes Away : प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचं निधन झाले आहे. सांतिरानी असं त्यांच्या आईचं नाव आहे. 6 जूलै रोजी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आईच्या जाण्यानं मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) मातृशोकात आहेत. मिथून यांचा सर्वात मोठ्या मुलानं नमाशी याने आजीच्या निधनाची माहिती दिली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंत कुमार चक्रवर्ती यांचे २१ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते मिथुनने आपल्या आईलाही गमावले आहेत. मिथुन चक्रवर्ती काही काळ कोलकात्यातील जोराबागन भागामध्ये आई-वडील आणि चार भावंडांबरोबर राहत होते.
परंतु जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनयाच्या जगात नाव कमावले, तेव्हा तो आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन गेला होता. मिथुन चक्रवर्ती मुंबईमध्ये राहू लागला, तेव्हा देखील त्याने आपल्या आई- बाबांना सोबत ठेवले होते. तेव्हापासून त्यांची आई शांतिराणी चक्रवर्ती मुंबईमध्ये त्यांच्यासोबत राहत होती.
Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले
मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाबद्दल बंगाल भाजपच्या वतीने देखील शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मिथुन चक्रवर्ती यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईचे खूप महत्त्वाचं स्थान होते. त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी आपल्या आईने मोठी साथ दिली होती. सांतिरानी यांचे मिथुन हे एकुलता एक मुलगा होते. सांतिरानी या मुलगा मिथुन, सून आणि नातवंडांसोबत मुबंईत राहत होत्या.